S. K. Patil Sindhudurg Mahavidyalaya, Malvan

‘Botanical Garden Opening Ceremony’ व ‘माजी विद्यार्थी निवृत्ती निमित्त सत्कार सोहळा’

आज गुरुवार दि. १९ नोव्हेंबर, २०२० रोजी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे ‘Botanical Garden Opening Ceremony’ व ‘माजी विद्यार्थी निवृत्ती निमित्त सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.

आमच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे १९८३ च्या बॅच चे विद्यार्थी मान. माजी कर्नल श्री. एन. के. देसाई यांच्या हस्ते नव्याने बनविण्यात आलेल्या Botanical Garden चे उद्घाटन सर्वप्रथम कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण चे कार्याध्यक्ष मान. बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या उपस्थितीत झाले.

त्यानंतर महाविद्यालयातील झांट्ये सभागृह या ठिकाणी भारतीय सैन्य दलात ०८ डिसेंबर, १९८४ रोजी भरती झालेले व ३६ वर्षे ०८ महिने सेवा बजावून कर्नल या पदावर दिनांक  ३१ ऑगस्ट, २०२० रोजी निवृत्त झालेले आमच्या महाविद्यालयाचे  १९८३ च्या बॅच चे माजी विद्यार्थी मान. माजी कर्नल श्री. एन. के. देसाई यांचा त्यांच्या मातोश्री श्रीमती गीता कमलाकर देसाई यांच्या उपस्थितीत निवृत्ती निमित्ताने सत्कार सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाने केले होते. या कार्यक्रमास कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण चे कार्याध्यक्ष मान. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव मान. श्री. गणेश कुशे, सदस्य मान. श्री. संदेश कोंयडे, माजी प्राचार्य मान. गीरसागर सर, प्राचार्य डॉ. मंडले सर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.