Principal's Message
महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आपलं भविष्य आहे. भविष्यकाळातील मनुष्य बळाच्या क्षमतावर आपल्या महाविद्यालयाचे चैतन्य अवलंबून आहे. भविष्य घडविणा-या आणि भविष्यातील नेतृत्व करणा-या आपल्या युवा वर्गाची जबाबदारी आणि सचोटी यावर आपली मूल्ये अवलंबून आहेत. आवश्यक असलेली बुध्दीमत्ता क्षमता, साधन संपत्ती लक्षावधी तरुणांच्याकडे उपलब्ध आहे. परंतु ती आपल्याकडे उपलब्ध आहे याची जाणीव बहुसंख्य विद्यार्थ्यांना नाही. विद्यार्थ्यांचे आयुष्य साधं आणि सोपं मुळीच नाही. परंतु मिळालेल्या आयुष्याला सुंदर बनविण्याचा शिक्षण हा सर्वात महत्वाचा घटक आहे. Education is the most powerful weapon which can change the world. त्यासाठी As a Student, Reader, Professor यांनी सतत प्रयत्नशील रहायला हवं कारण २१ वे शतक हे ज्ञानाचे आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वत:च्या ज्ञाना बाबत पुन्हा पुन्हा शंका घेत रहाणे आवश्यक आहे. तसेच आपण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग स्वत: ला, नंतर समाजाला आणि देशाला कशा प्रकारे होवू शकेल याचाही विचार केला पाहीजे.
आपल्या जीवनाचा, आयुष्याचा अर्थ कोणालाच कळलेला नाही.शिक्षणामुळे तुमच्या जीवनाला खरोखरच अर्थ प्राप्त होवू शकेल यासाठी –
- प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार केला पाहिजे.
- विचार करेन तर प्रत्येक गोष्ट विलक्षण वाटेल
- आश्चर्य आणि विलक्षण शोधण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहीजे.
- तुम्हाला कोण व्हायचं आहे यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार जास्त करा.
विद्यार्थ्यांनी भूतकाळापासून शिकलं पाहीजे. परंतू भूतकाळाचा जास्त विचार करता उपयोगी नाही. कारण भूतकाळ हा भूतकाळच असतो. मात्र वर्तमानकाळ, महत्वाचा आहे. वर्तमान काळात जगलं पाहीजे. परंतू वर्तमानात आपल्याला चांगलं जगता येत नाही भविष्या बाबत आशा बाळगा. विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी का ? प्रश्न निर्माण झाला पाहीजे.
यशस्वी विद्यार्थी बनन्यासाठी प्रयत्न करु नका तर चांगला विद्यार्थी बनन्यासाठी प्रयत्न करा. कारण समाजाला, देशाला, कुटुंबाला चांगल्या विद्यार्थ्यांची गरज निर्माण झालेली आहे. ब-याच वेळा आपलं आयुष्य डोळ्याला झापडं लावून किंवा एका विशिष्ट चौकटीत जगण्याची वृत्ती सगळ्यांचीच असते. त्यापेक्षा परमेश्वराने प्रत्येकाला स्वतंत्र बुध्दी दिलेली आहे. म्हणजेच मिळालेल्या बुध्दीचा विचार करुन जगायला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नव्या कल्पना, नव्या विचारांना मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुनरावृत्ती करणे शक्यतो टाळावे. कारण त्यामुळे नवीन विचार निर्माण होत नाहीत. प्रत्येकवेळी एखादी नवीन कल्पना स्वीकारणं तिला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करणं ते साकारल्यावर पुन्हा एखाद्या नव्या कल्पनेवर काम करणं हे विद्यार्थांचे प्रमुख कर्तव्य असलंच पाहीजे.
आयुष्यही आपल्यापैकी कोणासाठीच एक सोपी गोष्ट नाही म्हणून काय झालं? विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मविश्वास, नवीन दृष्टिकोन कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. स्वतःबद्दल आत्मविश्वास असला पाहिजे. तुमच्यामध्ये प्रचंड सुप्त गुण आहेत. यावर तुमचा ठाम विश्वास असला पाहिजे आणि ते गुण तुम्हीच शोधले पाहिजे आणि विकसित केले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी म्हणून तुमचं जगणंही विलक्षण असेल.