मराठी विभाग
मराठी विभागाची संक्षिप्त स्वरुपात माहिती
महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच महाविद्यालयामध्ये मराठी विभाग कार्यरत आहे. हा विभाग वृद्धींगत व्हावा विभागातील विद्यार्थी संख्या वाढावी, साहित्यविषयक जाणीव विद्यार्थ्यांच्या मध्ये चांगल्याप्रकारे निर्माण व्हावी या दृष्टीने प्रथम पासूनच प्रयत्न झालेले आहेत. या विभागाला व्यासंगी व तज्ञ मराठीचे प्राध्यापक लाभले आहेत काही विद्यार्थी मुंबई विद्यापीठामध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. या विभागातून बाहेर पडलेले विद्यार्थी आज चांगल्या पदावरती कार्यरत आहेत.
मराठी विभागास योगदान दिलेले प्राध्यापक
मा. कै. प्रा. व्ही. आर. अभ्यंकर यांनी फार मोठे योगदान या विभागास दिले आहे. मराठीचे गाठे अभ्यासक व उत्तम वक्ते म्हणून त्यांची ओळख होती. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ते ओळखले जात होते. त्याचप्रमाणे मा. प्राचार्य डॉ. मुरलीधर जावडेकर, यांनी ही या विभागास महत्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. जावडेकर हे एक अभ्यासू व व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांची महाविद्यालयात ओळख होती. या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे. मा. कै प्रा. भारती सामंत या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून महाविद्यालयात कार्यरत होत्या. एक प्रेमळ परोपकारी कर्तव्यदक्ष प्राध्यापिका म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांनी उत्तम प्रकारची सेवा विभागास दिली होती. प्रसंगानुरूप व जागेच्या कमतरतेनुसार काही काळासाठी प्राध्यापकाची नियुक्ती या विभागात करण्यात आली या प्राध्यापकांनी काही काळ महाविद्यालयात सेवा दिली त्यामध्ये प्रामुख्याने प्रा. शशीकला कांबळे, प्रा. राजन वेंगुर्लेकर, प्रा. ललिता मेस्त, प्रा. मीना मुळ्ये, प्रा. मनीषा बनसोडे, प्रा. शिल्पा परब इत्यादींनी या विभागास उत्तम सेवा दिली आहे. त्यांच्या ऋणांची जाणीव महाविद्यालयाने ठेवली आहे.
मराठी विभागाविद्यमान प्राध्यापक
अ) प्रा. कैलास राबते –
दि. १८/११/२००० पासून ते या विभागात कार्यरत आहेत मुलांच्यामध्ये साहित्यविषयक जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. विभागाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबविले आहेत अभ्यासक्रम विषयक कार्यशाळा, चर्चासत्रे त्यांनी भरविली आहेत त्यांची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.
- मराठी प्राध्यापक परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहतात.
- महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाचे ते प्रमुख आहेत.
- मुंबई विद्यापीठाच्या भरारी पथकात त्यांची सदस्य म्हणून निवड झाली होती.
- नगरवाचन मंदिर, सेवांगण यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पहिले आहे.
- मराठी भाषा – साहित्य समाज आणि संस्कृती या विषयाच्या अनुसंगाने त्यांनी व्याख्याने दिली आहेत.
- महाविद्यालयातील जिमखाना विभाग, सांस्कृतिक विभाग राष्ट्रीय सेवा योजना, महिलाविकास कक्ष इ. प्रमुख म्हणून त्यांनी काम पहिले आहे. तसेच परीक्षाविभागात सदस्य म्हणून ते कार्यरत होते.
- मराठी भाषा दिनाच्या आयोजनामध्ये त्यांचा पुढाकार असतो.
- “ अरुण शेवते यांच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास ” या विषयावर मुंबई विद्यापीठामध्ये पीएचडी संशोधनाचे कार्य ते करतात.
- महाविद्यालयातील मराठी विभागात ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
- महाविद्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात मराठीच्या अध्यापनाचे कार्य ते करतात.
ब) प्रा. डॉ. यु. वाय. सामंत –
सन २००३ पासून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत एक अभ्यासू व करारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.
१) नगरवाचन मंदिर, सेवांगण यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून त्यांनी काम पहिले आहे.
२) महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, परीक्षाविभाग, महिला विकास कक्ष इ. प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे तसेच राष्ट्रीय सेवा योजना एन.सी.सी. विभागात ही त्यांनी काम केले आहे.
३) मराठी भाषा विषयाच्या संदर्भात त्यांनी विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत.
४) महाविद्यालयाने आयोजित केलेल्या अनेक उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग असतो.
५) आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्रावरून त्यांचे भाषण प्रसारीत झाले आहे.
६) शिवाजी विद्यापीठातून “कोकणातील ठाकर समाजाचे लोक साहित्य” या विषयावर त्यांनी पीएचडी संपादन केली आहे तसेच एल.एल.बी ही पदवी त्यांनी संपादन केली आहे.
७) स्फूट स्वरूपाचे लेखन त्यांचे मासीकातून प्रसिद्ध झालेले आहे.
८) विविध महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये त्यांचे पेपर वाचन झाले आहे.
९) अस्मिता अंकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पहिले आहे.
१०) विभागाने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा मोलाचा वाट असतो.
मराठी विभागाची ध्येयधोरणे
- विद्यार्थ्यांच्यामध्ये कलेची आवड निर्माण करणे.
- मराठी भाषाविषयाची गोडी विद्यार्थ्यांच्यामध्ये वाढीस लावणे.
- साहित्यविषयक जाणीव निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांच्यामधील वाचन संस्कृती वृद्धींगत करणे.
- सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.
- मराठी भाषा साहित्य-समाज–संस्कृतीचे महत्व पटवून देणे.
- मराठी भाषेबरोबरच अन्य भाषांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे.
- थोर साहित्यिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे.
- उत्कृष्ट व प्रभावी वक्ते तयार करणे.
- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे.
मराठी विभागाने राबविलेले उपक्रम
विद्यार्थ्यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नेहमीच प्रबोधनपर उपक्रम या विभागाने राबविले आहेत ते खालील प्रमाणे –
१) काव्यवाचन स्पर्धा | ६) विभागामार्फत विविध सहलीचे आयोजन |
२) निबंध स्पर्धा | ७) प्रभावी वक्त्यांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. |
३) हस्ताक्षर स्पर्धा | ८) कार्यशाळेचे आयोजन |
४) अन्य कवींचा काव्यगायनाचा कार्यक्रम | ९) चर्चासत्राचे आयोजन |
५) मराठी भाषा दिन | १०) हस्तलिखितांचे प्रकाशन इ. |
मराठी विभागातून बाहेर पडलेले माजी विद्यार्थी
महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजतागायत अनेक गुणवंत विद्यार्थी या विभागातून बाहेर पडली आहेत त्यांची ओळख खालील प्रमाणे :-
१) हरिहर नातू (प्रसिद्ध कीर्तणकार) | ११) प्रा. बाळकृष्ण खरात (मानंद डॉक्टरेट) |
२) राजू शेट्टी (पत्रकार, प्रतिनिधी) | १२) हेमांगी मांजरेकर |
३) संदेश कोयंडे ( सामाजिक कार्यकर्ते) | १३) सुचित्रा बांदेकर ( मराठी विषयात सुवर्णपदक) |
४) ऋषी देसाई (वृत्त निवेदक) | १४) हेमंत रामाडे (प्रसिद्ध मूर्तिकार) |
५) संग्राम कासले (पत्रकार) | १५) शर्वरी पाटणकर |
६) कुणाल मांजरेकर (पत्रकार) | १६) मनोज खोबरेकर (उद्योजक) |
७) प्रशांत हिंदळेकर (पत्रकार) | १७) मनोज चव्हाण (पत्रकार) |
८) विनोद सातार्डेकर (प्रसिद्ध कलाकार) | १८) रविंद्र गणपत गावडे (नेट उत्तीर्ण) |
९) प्रा. मीना मुळ्ये (मराठी विषयात सुवर्णपदक) | १९) प्रा. कल्याणी राणे |
१०) प्रा. मनीषा बनसोडे (नेट उत्तीर्ण) | २०) मनोज चव्हाण (पत्रकार) |
अशा अनेक विद्यार्थ्यांची यादी देता येतील ती सर्व आज आपआपल्या पदावर कार्यरत आहेत.