S. K. Patil Sindhudurg Mahavidyalaya

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस प्रारंंभ-सुचना

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2020 -21 साठी ऑनलाईन प्रवेश प्रकियेस सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने देखील वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेतील प्रवेश प्रकियेस सुरुवात केली आहे. ही सर्वप्रक्रिया ऑनलाईन करावयाची असल्याने विद्यार्थ्यानी महाविद्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांनी स्पष्ट केले आहे.

FY/SY/TY Admission संदर्भातील पुढील सूचना नीट समजून घ्याव्या व विद्यार्थ्यानी प्रक्रिया सुरू करावी असे आवाहन प्रवेशसमितीने केले आहे.
प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखे मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम महाविद्यालयाचे Prospectus (माहितीपुस्तिका) समजून घ्यावी. उपलब्ध विषय, फी, समजून घ्यावेत. हे माहितीपत्रक http://ksdsmandalmalvan.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यातील विषय लिहून घ्यावेत.

नंतर मुंबई विद्यापीठाच्या http://www.mum.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=942 या लिंकवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी युजरनेम व पासवर्ड जपून ठेवावा . नंतर प्रत्यक्ष प्रवेशअर्ज भरावा प्रवेशअर्ज कसा भरावा याचा व्हिडीओ आधी पाहून घ्यावा . तो याच लिंकवर उपलब्ध आहे.

फॉर्म भरताना सर्व कागदपत्रे बाजूला ठेवावीत, पासपोर्ट size स्पष्ट दिसणारा फोटो अपलोड करावा. सर्व माहिती भरल्याशिवाय फॉर्म submit होणार नाही . सबमिट केल्यावर प्रिंट ऑप्शन वापरून, पीडीएफ फाईल सेव्ह करून ठेवा व नंतर सर्व कागदपत्रे कॉलेज मध्ये जमा करताना त्यासोबत त्या पीडीएफची प्रिंट काढून जमा करा.

त्यानंतर महाविद्यालयाच्या http://ksdsmandalmalvan.in/admission-skp/ या लिंकवर जाऊन महाविदयालयाचा प्रवेशअर्ज भरावा.
हे प्रवेश अर्ज मोबाईल अथवा संगणकावर विद्यार्थी कुठूनही भरू शकतात.

याच पद्धतीने द्वितीय व तृतीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील आधी मुंबई विद्यापीठाचा प्रवेशअर्ज व नंतर स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज संपूर्णपणे भरावेत. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्व तपशील अचूक भरावा नंतर तपासून पाहावा, मग अर्ज सबमिट करावेत .फॉर्मची कॉपी व फी महाविद्यालयात जमा करण्यासंदर्भात नंतर सविस्तर सूचना देण्यात येईल. Covid – 19 संदर्भातील सर्व सूचना व नियम पाळून सर्वानी ही प्रक्रिया पार पाडायची आहे.

मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या सूचनांप्रमाणे महाविद्यालय तासिका ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुरू करण्यापूर्वी त्यासंदर्भात सूचना दिली जाईल.

सध्या आलेल्या guidelines प्रमाणे दिनांक 01 ऑगस्ट, 2020 पासून S. Y. व T. Y. यांचे Online lectures सुरू होत आहेत. ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी गरजेचा अँड्राईड मोबाईल वा इंटरनेट नाही, त्यांच्यासाठी कोणत्या पर्यायी मार्गाने शिक्षण देता येईल याचा महाविद्यालय विचार करत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय सर्वतोपरी प्रयत्नशील राहील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन प्राचार्य मंडले यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना शंका असल्यास त्यांनी प्रा. एस. पी. खोबरे यांच्याशी 7588133972, 8766989636 या मोबाईल वर अथवा व्हॉटसअप वर संपर्क साधावा.

महाविद्यालयाच्या उपरोक्त वेबसाईटवर वेळोवेळी माहिती अपडेट केली जाईल याची विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी. त्याच बरोबर आपल्या परिसरातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सर्व नागरिकांनी ही माहिती द्यावी व त्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत सर्वतोपरी सहकार्य करावे.