Intercollegiate Essay Competition

(जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा)

जागतिक पर्यटन दिन, २७ सप्टेंबर, २०२१

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेत या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाला ‘सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन’ असे घोषवाक्य निश्चित केले आहे.
जागतिक पर्यटन संघटना पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने या क्षेत्राच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करते तसेच पर्यटन विकासासाठी कार्य करते. भारतासह या संघटनेचे १५५ सदस्य आहेत. स्पेनमधील टोरोमॉलीनोज येथे १९७९ मध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या सभेत १९८० पासून पर्यटन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरवर्षी पर्यटन दिनाच्या ‍निमित्ताने या क्षेत्राशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा घडवून आणली जाते. वर्षभरासाठी एक संकल्पना निश्चित करून त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन जगभरात करण्यात येते. यापूर्वी सांस्कृतिक बंध, पर्यटन आणि जैवविविधता, महिलांसाठी संधी, पर्यावरण बदलास प्रतिसाद, क्रीडा आणि पर्यटन, खाजगी क्षेत्राचा सहभाग अशा विविध विषयांवर विचार करण्यात आला आहे. यावर्षी ‘सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन’ हा विषय अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
पर्यटन हा जगातील रसायने आणि इंधनानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यवसाय आहे. जगभरातील अनेक नागरिकांसाठी उत्कर्षाचे साधन आणि जीवनाची आशा म्हणून या क्षेत्राचे मोठे योगदान आहे. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वाहतूक, हॉटेल्स, मनोरंजन आदी व्यवसायही पर्यटनाशी जोडले गेले आहेत. जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात १९७० पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. २७ सप्टेंबर १९८० रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते. पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारु शकते. नैसर्गिक सौदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी जावं म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्वाचे ठरतात. सिंगापूर सारख्या काही देशांची आर्थिक स्थिती ही फक्त पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असते.

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्यास जातो. १९९७ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आमच्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, जि. सिंधुदुर्ग मार्फत २७ सप्टेंबर,२०२१ ते ०३ ऑक्टोबर,२०२१ या दरम्यान ‘पर्यटन सप्ताह २०२१’ चे आयोजन केले आहे. या पर्यटन सप्ताहाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करत आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा ही विनंती.

स्पर्धेसाठी विषय
१) सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन
२) सिंधुदुर्ग: पहिला पर्यटन जिल्हा
३) कोविड- १९ महामारी व पर्यटन
४) भारतीय पर्यटन
५) पर्यटनाचा शाश्वत मार्ग

स्पर्धेसाठी अटी व नियम
१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही वरीष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांनीच या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे.
२) वरील पैकी एका विषयावर इंग्रजी, हिंदी किंवा मराठीत निबंध लिहायचे आहे. निबंध हा हाताने लिहलेला किंवा टाईप स्वरुपात चालेल. निबंध हाताने लिहलेला असेल तर अक्षर वाचता येण्यासारखे नीट असावे.निबंध जर टाईप स्वरुपात असेल तर युनिकोड पद्धतीने तयार केलेला असावा.
शब्दमर्यादा:- ३००० ते ५००० शब्द.
३) निबंध हा PDF स्वरुपात दिलेल्या गुगल फॉर्म मध्येच online स्वरुपात जमा करावा. PDF फाईल ची साईझ १० MB पेक्षा कमी असावी.
४)निबंधामध्ये वापरलेले साहित्य उदा. छायाचित्रे, इतर साहित्य यांचा संदर्भ योग्यरीत्या शेवटी द्यावा. कॉपीराईट ची सर्व जबाबदारी संबधित विद्यार्थ्याची राहील.
५) निबंधाची सॉफ्ट कॉपी पीडीएफ स्वरूपात दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये २७ सप्टेंबर,२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजेपर्यंत पाठवावेत. त्यानंतर आलेल्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.
६) विद्यार्थ्यांनी पुढील गुगल form वर आपले निबंधजमा करावेत
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd-YG04zlE1IPDlqcoG4TU6pZXSrDz_xvQ1LPvxiFCSBiJ3WA/viewform?usp=sf_link
७) एका विद्यार्थ्यास एकच निबंध पाठवता येईल. निबंध जमा केल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल वर सहभागी प्रमाणपत्र मिळेल.
८) स्पर्धेचे परीक्षण निवडलेल्या परीक्षकांकडून करण्यात येईल. सहभागी विद्यार्थ्यांमधून सर्वात जास्त गुण मिळवणारे पहिले तीन नंबर काढण्यात येतील व त्यांना त्यांच्या मेल वर स्वतंत्र सर्टिफिकेट पाठविण्यात येईल.

अधिक माहिती साठी संपर्क
प्रा.एस.पी.खोबरे, कार्यक्रमअधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना – ७५८८१३३९७२,८७६६९८९६३६

प्रा. बी.एच.चौगुले, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना – ७८२०९३८१३६

कु. पूर्वा वेंगुर्लेकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना – ९३२२२९६८७१

कु. रथराज तुरी, विद्यार्थी प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजना – ७५८८५६५७०८